Dry Salted Surmai Fish Curry | सुक्या खाऱ्या सुरमईचं आंबट | Special Authentic OLD Koli Recipe

×

Tags

Similar Seafood Images

Yummy Cucumber Dry Fish Recipe by my Grandma |

Yummy Cucumber Dry Fish Recipe by my Grandma |

Dry Fish Brinjal Curry Recipe | Village Style | Cooking By Street Village Food

Dry Fish Brinjal Curry Recipe | Village Style | Cooking By Street Village Food

Kochur Loti & Sutki Mach Recipe | Arum Lobe and Dry Fish Curry Cooking By Street Village Food

Kochur Loti & Sutki Mach Recipe | Arum Lobe and Dry Fish Curry Cooking By Street Village Food

SPICY Lemon Masala Fish Fry I dry masala machli fry Recipe I Besan wali Crispy Fish Fry recipe

SPICY Lemon Masala Fish Fry I dry masala machli fry Recipe I Besan wali Crispy Fish Fry recipe

Fry Dry Fish Recipe

Fry Dry Fish Recipe

Village Food Churi Shutki Bhuna Recipe Bengali Dry Fish Vuna Curry Easy Clean & Cooking Churi Shutki

Village Food Churi Shutki Bhuna Recipe Bengali Dry Fish Vuna Curry Easy Clean & Cooking Churi Shutki

Dry Salted Surmai  Fish Curry | सुक्या खाऱ्या सुरमईचं आंबट | Special Authentic OLD Koli Recipe

Dry Salted Surmai Fish Curry | सुक्या खाऱ्या सुरमईचं आंबट | Special Authentic OLD Koli Recipe

DRY FISH AND EGGPLANT CURRY RECIPE | FISH BRINJAL KI CURRY | NEVER SEN BEFORE LONG RIBBONFISH FILLET

DRY FISH AND EGGPLANT CURRY RECIPE | FISH BRINJAL KI CURRY | NEVER SEN BEFORE LONG RIBBONFISH FILLET

Karuvattu Kulambu | Dry Fish Recipe

Karuvattu Kulambu | Dry Fish Recipe

Naga Style Bamboo Shoot Chutney with Fermented Dry Fish Recipe

Naga Style Bamboo Shoot Chutney with Fermented Dry Fish Recipe

Enjoy delicious quick and easy Dry Salted Surmai Fish Curry - Chef Durgesh Bhoir - Mi Hay Koli

Visit us – http://www.mihaykoli.co.in
Write us – [email protected]

साहित्य - सुकवलेल्या खाऱ्या सुरमाईचे ९ ते १० तुकडे, २ मोठे कांदे पात्तळ चिरलेले, २ चमचे आले, लसूण आणि मिरची पेस्ट, एक वाटी मध्यम काप केलेलं टोमॅटो, २ चमचे चिंचेचा कोळ, एक चमचा हळद, ३ चमचे ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला ( लॉट संपल्यामुळे या मसाल्याची नवीन बुकिंग डिसेंबर अखेरीस चालू होईल ), २ मध्यम काप केलेली वांगी, २ चमचे तांदळाचे पीठ, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवी नुसार मीठ

कृती - सर्व प्रथम कोमट पाणी करून एका बाउल मध्ये खाऱ्या सुरमईचे तुकडे टाकावेत. आणि या कोमट पाण्या मध्ये किमान २ - ३ वेळा हे सर्व सुरमईचे तुकडे स्वच्छ धुवून घ्यावेत. सुरमई स्वच्छ धुवून झाल्यावर त्यांना कोरडे करून एका प्लेट मध्ये काढून घ्यावेत. एका पातेल्यात किंव्हा कढईत ३ मोठे चमचे तेल घेऊन चांगले तापवून घ्यावेत. तेल चांगले तापल्यावर यात पात्तळ चिरलेला कांदा टाकावा. कांदा या तेलात लालसर रंगापर्यंत तळून घ्यावा. कांदा तळून झाल्यावर यात २ चमचे आले, लसूण आणि मिरची पेस्ट टाकावी, एक चमचा हळद टाकावी ३ चमचे ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला टाकावा. मसाला यात चांगला परतून घ्यावा. मसाला परतून झाल्यावर यात आता काप केलेली वांगी टाकावीत, काप केलेले टोमॅटो टाकावेत. वांगी आणि टोमॅटो या मसाल्यात चांगले एकजीव करून घ्यावेत . सर्व मिश्रण एकजीव करून झाल्यावर यात खाऱ्या सुरमईचे तुकडे टाकावेत. आता सुरमई देखील या मिश्रणात चांगली घोळून घ्यावी. सुरमई मिश्रणात घोळून झाल्यावर यात साध्या किंव्हा कोमट पाण्याचा वापर करून किमान २ मोठे ग्लास पाणी टाकावे. आता सर्व मिश्रण चांगले घोळून घ्यावे . जेणेकरून सर्व मसाले व्यवस्थित ब्लेंड होतील. आता या आंबटाला (curry) एक उकळी काढावी. उकळी निघे पर्यंत एका बाजूला आपण एका वाटीत २ चमचे चिंचेचा कोळ टाकून त्यात सोबत २ चमचे तांदळाचे पीठ टाकावे आणि त्यात थोडे पाणी टाकून चांगले मिक्स करून घ्यावेत. आता आपल्या आंबटाला छान उकळी आली आहे. यात आता आपण जे पिठाचे आणि चिंचेच्या कोळाचे मिश्रण बनविले आहे ते यात टाकावे. चिंचेचा कोळ हा २ चमच्या पेक्षा जास्त घेऊ नये . कारण आपण यात टोमॅटो सुद्धा वापरली आहेत. नाहीतर आपल्या आंबटाला जास्त आंबटपणा येण्याची शक्यता आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी. चवीनुसार मीठ. एक गोष्ट लक्षात ठेवा हि खारी मासळी असल्यामुळे पहिल्यापासून हिचा थोडा खारटपणा यात उतरलेला असतो. त्यामुळे रस्सा चाखून पहा आणि आवश्यकता वाटलीच तरच मीठ टाकावे . नाहीतर नाही मीठ टाकले तरी चालेल. आता १५ मिनिटे चांगली उकळ काढावी. १५ मिनिटानंतर गॅस बंद करावा आणि मस्त गरमागरम वाढून घ्यावे. आपल्या सुकवलेल्या खाऱ्या सुरमाईचे आंबट तय्यार आहे. आजची ' सुकवलेल्या सुरमईच्या आंबटाची ' रेसिपी कशी वाटली तुम्हाला हे मला जरूर कळवा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा.
Yummy Cucumber Dry Fish Recipe by my Grandma |. Dry Fish Brinjal Curry Recipe | Village Style | Cooking By Street Village Food. Kochur Loti & Sutki Mach Recipe | Arum Lobe and Dry Fish Curry Cooking By Street Village Food. SPICY Lemon Masala Fish Fry I dry masala machli fry Recipe I Besan wali Crispy Fish Fry recipe. Fry Dry Fish Recipe. Village Food Churi Shutki Bhuna Recipe Bengali Dry Fish Vuna Curry Easy Clean & Cooking Churi Shutki. Dry Salted Surmai Fish Curry | सुक्या खाऱ्या सुरमईचं आंबट | Special Authentic OLD Koli Recipe. DRY FISH AND EGGPLANT CURRY RECIPE | FISH BRINJAL KI CURRY | NEVER SEN BEFORE LONG RIBBONFISH FILLET. Karuvattu Kulambu | Dry Fish Recipe. Naga Style Bamboo Shoot Chutney with Fermented Dry Fish Recipe.